विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला हरित लवादाचा दणका, मयत कामगाराला 60 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला हरित लवादाचा दणका, मयत कामगाराला 60 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

पद्मश्री डॉ विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अनियोजित स्पेंट वॉश विल्हेवाट विरोधात कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापु पवार यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पश्चिम विभागीय खंडपीठ पुणे यांनी कारखान्यातील स्फोटात मरण पावलेल्या कामगाराच्या कुटुंबाला 60 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत.

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथूील कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशबापू पवार यांनी विखे पाटील साखर कारखान्याने त्यांच्या शेतात परवानगी न घेता अवैधरित्या टाकलेल्या स्पेंट वॉशमुळे डाळिंब बागेला झालेल्या नुकसानी विरोधात महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कमिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्या अल्प कारवाईमुळे पवार यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती.

8 नोव्हेंबर 2017 रोजी न्यायाधिकरण यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रभावित क्षेत्रातील माती व भूगर्भातील पाण्याला झालेल्या नुकसानीचे अहवाल तसेच त्याची नुकसान भरपाई कशी करता येईल याचा अहवाल सादर करण्याचे फर्मावले होते. त

सुनावणी दरम्यान कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांच्या वकिलांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, 6 एप्रिल 2016 रोजी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघातामध्ये 3 बळी व 12 जणांना झालेली गंभीर दुखापत याकडे सहाय्यक संचालक औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभाग नगर यांनी केलेले तपासणीकडे लक्ष वेधले. त्या अनुषंगाने सदर याचिकेमध्ये अंतिम निकाल सुनावताना विखे पाटील साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या टँकर स्फोटांच्या अनुषंगाने प्रिन्सिपल बेंचने गठीत केलेल्या समितीचे अहवाल पाहता मयत झालेल्या 3 कामगारांच्या वारसांना 60 लाख रुपये रक्कम व इतर दुखापत झालेल्या कामगारांना प्रत्येकी 2.5 लाख ते 5 लाख रक्कम नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश पारित केले आहेत.

ज्या दिवशी कारखान्यात टाकीचा स्फोट झाला होता त्यावेळी कामगारांचे मृतदेह जळत होते. दुसरीकडे कारखान्याचे चेअरमन राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे शिर्डीमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमात व्यग्र होते, असे पवार यांनी सांगितले. या स्फोटानंतर पवार यांनी पाठपुरावा केला त्यामुळे राहता न्यायालयात कारखान्याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;