भाजपाळलेले मिंधे, मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा; शिवसेनेची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चंद्रपूर येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी झालेल्या प्रचारसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. या प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी चक्क भाजपचे कमळ चिन्ह असलेला शेला घातल्याचे दिसत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेने त्यांच्या अधिकृत एक्स पेजवर या सभेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे यांच्या गळात भाजपचा शेला दिसून येत आहे. त्यावरून शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केला. ”मुख्यमंत्री तोतया शिवसेनेचा, गळ्यात पट्टा भाजपाचा”, असा टोला शिवेसनेने लगावला आहे.
याच सभेत मुनगंटीवारांची जीभ घसरली
या सभेत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला, त्यामुळे उपस्थितांचे विशेषतः महिलांचे माना शरमेने झुकल्या. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर झोपवणारा पक्ष असे वर्णन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List