अरविंद केजरीवाल यांची अटकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

अरविंद केजरीवाल यांची अटकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे.


दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. कोर्टाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक ही कायद्याचे उल्लंघन नाही, त्यामुळे त्यांच्या कोठडीला बेकायदेशीर ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे.

केजरीवालांचे वजन साडेचार किलोने घटले

आपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केल्यापासून आतापर्यंत त्यांचे साडेचार किलो वजन घटले आहे, तर तिहार तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांची प्रकृती उत्तम आहे. येथील डॉक्टरांनीही त्यांच्या तब्येतीबाबत कोणताही चिंता व्यक्त केलेली नाही, असा दावा केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;