ममता बॅनर्जींचा मोदींवर हल्लाबोल, नेत्यांच्या तुरुंगवारीवरून दिला इशारा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला तुरूंग बनवण्याचे काम करत आहेत. सरकारच्या एका खिशात सीबीआय तर दुसऱ्या खिशात सक्तवसुली संचालनालय आहे. पण आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठवले तर त्यांच्या पत्नी रस्त्यावर उतरतील असा इशाराच दिला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले होते आणि 4 जूननंतर भ्रष्टाचारविरोधात कारवाई करणार असल्याचे बोलले होते. त्याचा खरा अर्थ विरोधकांना तुरूंगात टाकणे आहे’. त्यांनी जनतेला संबोधन पंतप्रधानांनी अशाप्रकारे बोलणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारला. पण जर मी निवडणुकीनंतर भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवले जाईल असे बोलले तर? मात्र मी असे बोलणार नाही, लोकशाहीत असं बोलता येणार नाही, लोकशाहीत अशा प्रकारची भाषा योग्य नाही.
यावेळी त्यांनी केंद्रिय तपास यंत्रणेवर निशाणा साधत म्हणाल्या की, भाजप संपूर्ण देशाला तुरूंग बनवू इच्छित आहे. लोकांना शोधून अटक करून त्यांना तुरूंगात टाकले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List