हरवलेले 45 मोबाईल शोधण्यास सायबर पोलीसांना यश

हरवलेले 45 मोबाईल शोधण्यास सायबर पोलीसांना यश

गेल्या आठ महिन्यात हरवलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात रत्नागिरी सायबर पोलीसांना यश आले आहे. रत्नागिरी सायबर पोलीसांनी हरवलेले 45 मोबाईल शोधले आहेत. हे मोबाईल पुन्हा मूळ मालकांना देण्यात आले आहेत.

सप्टेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या सर्व मोबाईलची माहिती सायबर पोलीस ठाण्याने घेतली. सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अमित यादव, सहाय्यक निरिक्षक नितीन पुरळकर, दुर्वा शेट्ये, रमीज शेख, नीलेश शेलार आणि अन्य पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी एकत्र काम करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. हरवलेले 45 मोबाईल शोधण्यात पोलीसांना यश आले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;