Delhi Liquor Policy : के. कविता यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडीत केली वाढ

Delhi Liquor Policy : के. कविता यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडीत केली वाढ

कथित दिल्ली मद्य धोरण मनी लाँड्रींग प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांना दिल्ली राऊज एव्हेन्यू न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यांना 15 मार्च 2024 ईडीने अटक केले होते. याआधी सोमवारी के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

सुनावणी दरम्यान के. कविता म्हणाल्या, ”ही राजकीय सूडाचे प्रकरण, विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीचा डाव आहे, याप्रकरणी केंद्रिय तपास यंत्रणेने कोठडीत माझा जबाब आधीच नोंदवून घेतला आहे”. सोमवारी 8 एप्रिल रोजी न्यायालयाने के. कविता यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. राऊज एवेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळताना सांगितले की, त्यांना अंतरिम जामीन देण्यासाठी ही योग्य वेळ नाही.

कविता यांनी अंतरिम जामीनासाठी न्यायालयाचे दरावाजे ठोठावले होते. के.कविता यांच्या मुलाची एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू होणार आहे. त्यांच्या 16 वर्षीय मुलाला परीक्षेदरम्यान आईची गरज आहे. आईची कमी भाऊ आणि वडील पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन मिळण्याची मागणी कविता यांच्या वकीलांनी केली होती. ईडीने यावर आक्षेप घेत दावा केला होता की, कविता यांनी या प्रकरणातील पुरावे नष्ट केले. त्यामुळे त्यांचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला होता. के. कविता यांना ईडीने 15 मार्च 2024 रोजी त्यांच्या हैदराबाद येथील घरातून अटक केली होती. त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;