नववर्षाचा शिर्डीत उत्साह; साईबाबा संस्थानमध्ये उभारली गुढी
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. नववर्षानिमित्त शिर्डीत उत्साहाचे वातावरण आहे. गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांचे हस्ते गुढीची विधीवत पुजा करुन श्री साईबाबा मंदीराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या पत्नी ज्योती हुलवळे, प्रशासकिय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
गुढीपाडवा उत्सवानिमित्त शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होतात. यंदाही भाविकांची संख्या जास्त असून मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List