नववर्षात शेअर बाजाराने उभारली उच्चांकी गुढी; पार केला 75 हजाराचा विक्रमी टप्पा

नववर्षात शेअर बाजाराने उभारली उच्चांकी गुढी; पार केला 75 हजाराचा विक्रमी टप्पा

गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपेकी एक मानला जातो. या दिवशी नव्या गोष्टींची सुरुवात करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी मांगल्याचे प्रतीक असलेली गुढीही उभारली जाते. शेअर बाजारानेही आज विक्रमी गुढी उभारली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात अनिश्चितता होती. मात्र, गेल्या आठवड्यात बाजारात तेजी होती. गुढीपाडव्यालाही बाजाराने जबरदस्त तेजी दाखवत विक्रमी टप्पा पार केला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर बाजाराने सुसाट वेगाने तेजी गाठली. मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात होताच निर्देशांकाने मोठी झेप घेत प्रथमच 75,000 चा विक्रमी टप्पा पार केला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकानेही तेजी घेत 22,700 या नव्या टप्पावर पोहचला. तसेच बॅक निफ्टीही 48,863 च्या टप्प्यावर पोहचला. मंगळवारी बाजाराची सुरुवात होताच सकाळी निर्देशांकाने पहिल्यांदा 75000 चा टप्पा गाठत बाजार 75,124.28 अंकांवर सुरू झालाय निर्देशांक काल दिवसअखेरी 74,742.50 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर सकाळी बाजार सुरू होताच निर्देशांकाने मोठी उसळी घेतली. निफ्टीनेही 22,765.10 चा विक्रमी टप्पा गाठला आहे.

शेअर बाजारात 1,662 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 584 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाली. गोदरेज प्रॉपर्टीज, इन्फोसिस, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज,एक्साइड इंडस्ट्रीज आणि टाटा समुहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;