गुढीपाडव्याला वरुणराजाचीही हजेरी; राज्यात 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता

गुढीपाडव्याला वरुणराजाचीही हजेरी; राज्यात 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता

देशभरात आणि राज्यात हवामानात बदल होत आहेत. एकाकडे कडक उन्हाच्या झळा तर दुसरीकडे अवकाळीचा फटका अशी हवामानाची स्थिती सध्या आहे. आता गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर वरुणराजाही हजेरी लावणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. तसेच पुढील 5 दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

गुढीपाडव्याला राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार आहे. तर मुंबई आणि उनगराचा परिसर आणि किनारपट्टीच्या भागात उकाडा वाढणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सरासरी तापमान 34 अशांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

राज्यासह देशाची राजधानी दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये 9 एप्रिलपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;