सराव शिबिरासाठी 33 सदस्यांची घोषणा

वृत्तसंस्था/ बेंगळूर

हॉकी इंडियातर्फे आगामी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी महिला हॉकीपटूंकरिता सरावाचे शिबिर आयोजित केले असून या शिबिरासाठी 33 महिला हॉकीपटूंची निवड करण्यात आली असून त्यामध्ये अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया आणि वंदना कटारिया यांचा समावेश आहे. या शिबिरासाठी 33 महिला हॉकीपटूं सहभागी होण्यास सज्ज झाल्या आहेत. सदर शिबिर 16 मे पर्यंत चालणार आहे.

हॉकी इंडियाने प्रारंभी या सराव शिबिराकरिता 60 हॉकीपटूंची निवड केली होती. त्यानंतर निवड चाचणीमध्ये हॉकीपटूंची संख्या कमी करण्यात आली. आता 33 संभाव्य महिला हॉकीपटूंची घोषणा करण्यात आली आहे. अलिकडेच राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेनंतर निवड चाचणीच्या जोरावर संभाव्य हॉकीपटूंची संख्या कमी करण्यात आली. भारतीय महिला हॉकी संघ अॅण्टवेर्प आणि लंडन येथे प्रयान करणार असून महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेला 22 मे पासून प्रारंभ होत आहे. प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेंटिना, बेल्जियम, जर्मनी आणि ब्रिटन संघांबरोबर लढती द्याव्या लागतील. 33 संभाव्य हॉकीपटूंच्या यादीमध्ये कर्णधार पुनिया, निकी प्रधान, सलीमा टेटे, अजमिना कुजुर, निशा, संगीता कुमार, वंदना कटारिया, लालरेमसियामी यांचा समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;