सुमित नागलचा पराक्रम

माँटे कार्लो मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था/ माँटे कार्लो

भारताच्या सुमित नागलने एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेत नवा पराक्रम करताना मुख्य स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत 38 व्या स्थानावर असणाऱ्या मॅटेव अरनाल्डीला तीन सेट्सच्या झुंजीत पराभवाचा धक्का दिला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय टेनिसपटू बनला आहे.

पात्रता फेरी पार करून सुमितने या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवित असा मान मिळविणारा पहिला भारतीय बनला होता. त्याने पहिल्या फेरीत इटलीच्या अरनाल्डीवर 5-7, 6-2, 6-4 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. त्याची पुढील लढत जागतिक सातव्या मानांकित डेन्मार्कच्या होल्गर रुनेशी होणार आहे. टॉप 50 मधील खेळाडूवर विजय मिळविण्याची नागलची ही तिसरी वेळ आहे. त्यापैकी दोन विजय त्याने या मोसमात मिळविले आहेत. जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 26 वर्षीय नागलने पहिल्या फेरीत 27 व्या मानांकित अलेक्झांडर बुबलिकला सरळ सेट्समध्ये हरविले होते. त्याने मार्च 2021 मध्ये अर्जेन्टिना ओपन स्पर्धेत जागतिक 22 व्या मानांकित चिलीच्या क्रिस्टियन गॅरिनलाही हरविले होते.

येथील स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने फ्लॅव्हिओ कोबोली (63 वा मानांकित) व अर्जेन्टिनाचा फॅकन्डो डायझ अॅकॉसटा (55 वे मानांकन) या आपल्यापेक्षा वरचे मानांकन असणाऱ्या खेळाडूंवर मात करीत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले. या विजयामुळे त्याने जागतिक मानांकनातील 80 वे स्थान निश्चित केले आहे. मागील वर्षी याच दिवशी त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च 93 वे मानांकन मिळविले होते. तो या वर्षीच्या इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेतही पात्र ठरला होता. पण मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याला कॅनडाच्या मिलोस रेऑनिककडून हार पत्करावी लागली होती. मियामी मास्टर्सच्या पात्रता फेरीतही त्याने भाग घेतला होता, पण तो मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नव्हता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;