बँक खाते उघडण्यास नकार दिल्याने केले अपहरण, तिघांना अटक

बँक खाते उघडण्यास नकार दिल्याने केले अपहरण, तिघांना अटक

शेअर मार्केटसाठी करंट बँक खाते उघडण्यास नकार दिल्याने तरुणाचे अपहरण करणाऱया तिघांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. पवन कीर, तुषार चाकोरकर, दिलखुष बद्री तेली अशी त्या तिघांची नावे आहेत, तर मुख्य सूत्रधार फरार आहे.

तक्रारदार तरुण हा गोरेगाव येथे राहतो. त्याची प्लेसमेंट एजन्सी आहे. फेब्रुवारी महिन्यात तुषार आणि फरार आरोपी हा त्याच्या कार्यालयात आले होते. तेव्हा त्याने आपल्याला शेअर मार्पेटमध्ये व्यवसाय करायचा आहे असे सांगितले. मुंबईत आपले कोणी नसल्याने पुरावे म्हणून करंट बँक खाते उघडले जात नसल्याच्या भूलथापा मारल्या. त्या दोघांनी तक्रारदाराला प्रत्येक खाते उघडण्यासाठी पैशाचे आमिष दिले. तक्रारदाराने त्याच्या पंपनीच्या नावावर दोन करंट बँक खाती उघडून दिली. त्यानंतर तुषार आणि फरार आरोपी हे पुन्हा त्याच्याकडे आले. त्याने पुन्हा बँक खात्याची मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने बँक खाते उघडून देण्यास नकार दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;