सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी थकवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी थकवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सेवानिवृत्त कर्मचाऱयांची देणी रखडवणाऱया संबंधित अधिकाऱयांना तातडीने निलंबित करा आणि निवृत्त कर्मचाऱयांची देणी तातडीने द्या आणि कर्मचाऱयांना देय दावे चक्रवाढ व्याजासह द्या, अशी मागणी करीत आज पालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे.

पालिकेच्या अत्यावश्यक सेवेत काम करणारे के.ई.एम, नायर, सायन, कुपर, नायर डेंटल या पाच मोठय़ा रुग्णालयात काम करणाऱया सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, अधिकारी यांना अत्यावश्यक सेवा बजाविण्यासाठी सेवा निवासस्थाने देण्यात आलेली आहेत. ही सेवा निवासस्थाने देत असताना भाडेमुक्त याप्रमाणे भाडे वसुल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मार्च 2023 नंतर 10 टक्के भाडे आकारण्यात यावे अशी लेखा विभागामार्फत त्रुटी काढून गेल्या वर्षापासून या सेवानिवृत्त कर्मचाऱयांचे दावे निकाली काढले जात नाहीत. अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता यांनी भाडेमुक्त देण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे 17 ऑक्टोबर 2023 रोजी सभा होऊन अत्यावश्यक सेवेत काम करणाऱया कोणत्याही कर्मचाऱयांना एचआरए व्यतिरीक्त कोणतेही भत्ते आकारू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत व तसा सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरीही प्रशासनाच्या वेळकाढू धोरणापायी हा प्रस्ताव आजतागायत सादर करण्यात आलेला नाही, असा आरोप युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर केला आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना 10 टक्क्यांचा नियम लागू होत नाही!

केईएममध्ये निवासस्थान मिळालेले सर्व कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. या कर्मचाऱयांना 10 टक्के भाडे अधिक देण्याचा नियम नाही. त्यांच्या पगारातूनच भाडय़ाची रक्कम कापली जाते. पण ज्यांची घरे मोठी आहेत आणि घरातच सर्व सुविधा आहेत, अशा केवळ मालमत्ता विभागातील कर्मचाऱयांना भाडय़ाबरोबर 10 टक्के अधिक म्हणजे सुमारे हजार रुपये अधिक भरायचे असतात. हा नियम माहीत असतानाही जर लेखापाल विभाग अशा प्रकारे मनमानी करत असेल तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून जी सेवा रुग्णालय आमच्याकडून घेते त्यालाच हरताळ फासण्याचा हा प्रकार आहे, असा संताप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे केईएमचे युनिट अध्यक्ष देवेंद्र सावंत यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;