बर्फीवाला पूल पाडायला नकोच, फक्त दोन स्पॅन उंचवावे लागणार; ‘व्हीजेटीआय’च्या अहवालाला ‘आयआयटी’चा ग्रीन सिग्नल

बर्फीवाला पूल पाडायला नकोच, फक्त दोन स्पॅन उंचवावे लागणार; ‘व्हीजेटीआय’च्या अहवालाला ‘आयआयटी’चा ग्रीन सिग्नल

अंधेरीतील गोखले ब्रीज आणि बर्फीवाला पुलामध्ये अंतराच्या तफावतीमुळे दोन्ही पूल जोडण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी बर्फीवाला ब्रीज पाडण्याची गरज नसल्याचा अहवाल व्हीजेटीआयनंतर आता आयआयटी, मुंबईनेही दिला आहे. पुलाच्या चार स्पॅनपैकी फक्त दोन पूल उंचवावे लागणार आहेत. जॅक आणि विशेष अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून पुलाचे स्लॅब उंचावले जाऊ शकतात, अशा उपायांबाबतही ‘व्हीजेटीआय’च्या सूचना आयआयटीने मान्य केल्या असून काही सुधारणाही सुचवल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण 26 फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूक काsंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची 2.8 मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला होता. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयकडे परीक्षण करून अहवाल मागवण्यात आला होता. अंधेरी पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक काsंडी फोडण्यासाठी बर्फीवाला पूल तोडून नव्याने बांधण्याचा पर्याय आहे. मात्र यासाठी तब्बल 100 कोटींचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे पालिकेने व्हीजेटीआयकडे सल्ला मागितला होता. यानुसार ‘व्हीजेटीआय’नंतर आता आयआयटीनेही आज अहवाला सादर केला. यानुसार आता वेगाने काम करून लवकरात लवकर उत्तर बाजूची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;