Lok Sabha Election 2024 : महालढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज, पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज संयुक्त पत्रकार परिषद

Lok Sabha Election 2024 : महालढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज, पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज संयुक्त पत्रकार परिषद

लोकशाहीच्या महालढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. नरिमन पॉइंट येथील शिवालय येथे होणाऱया या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण हे नेते लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आज माध्यमांना माहिती दिली. महाविकास आघाडीची पुढील दिशा, जागावाटप, प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल तसेच अन्य गोष्टींसंदर्भात आघाडीचे प्रमुख नेते उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला सामोरे जातील, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीत सर्व ठीक आहे, हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद होत आहे, असे ते म्हणाले.

– उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त असतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो. त्यामुळे उद्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;