महुआ मोईत्रा यांना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा
तृणमूल नेत्या महुआ मोईत्रा यांनी केलेली विधाने वस्तुनिष्ठ असतील तर त्यांना जाहीरपणे त्यांचा बचाव करण्यापासून रोखता येणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आज सांगितले. मोईत्रा यांना आपली बदनामी करणारी वक्तव्ये करण्यापासून रोखण्यासाठी अॅड. जय देहाडराय यांनी कोर्टाकडे अंतरिम मनाई निर्देश मागितले होते. रोख रकमेच्या बदल्यात प्रश्न प्रकरणाच्या संदर्भाने मोईत्रा यांनी आपल्याविरुद्ध कथित बदनामीकारक विधाने केल्याचा आक्षेप घेऊन देहाडराय यांनी 2 कोटींच्या नुकसानभरपाईसाठी खटला दाखल केला आहे. जर तुमचे आरोप सार्वजनिकरित्या उपलब्ध असतील तर मोईत्रा यांनाही त्यांचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. दोन्ही बाजू सार्वजनिकरित्या लढणार नसतील तर ती वेगळी बाब आहे. पण, तुम्ही जर सार्वजनिक टिपणी करणार असाल तरी त्यांनाही स्वतचा बचाव करण्यासाठी जागा असणे आवश्यक आहे, असे न्या. प्रतिक जालान यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List