दुकानावर मराठी पाटी नसेल तर 1 मेपासून दुप्पट दंड
मुंबईतील दुकानांवर 1 मेपर्यंत मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार आहे. शिवाय प्रकाशित ‘फलका’चा परवानाही रद्द केला जाणार असल्याचे सक्त निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी आज दिले. पालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत सुनाकणी झालेल्या 343 प्रकरणांत 32 लाख रुपयांचा तर न्यायालयात सुनाकणी झालेल्या 177 प्रकरणांमध्ये 13 लाख 94 हजार रुपये असा एकूण 45 लाख 94 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 3040 जणांना पालिकेने नोटीस बजावली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिकेशनात मार्च 2022 मध्ये दुकाने- आस्थापनांकरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंका दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांकर मराठी पाटय़ा असणे बंधनकारक होते. मात्र नक्या नियमानुसार कर्मचाऱयांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार दुकाने-आस्थापनांकरील पाटय़ा मराठीत लाकण्यासाठी देण्यात आलेली अखेरची दोन महिन्यांची मुदत 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपल्यानंतर पालिकेने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार 28 नोव्हेंबर 2023 पासून तपासणी कारवाई करण्यात आली.
अशी सुरू आहे कारवाई
– विभाग स्तरीय दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधावर व सुविधाकारांच्या पथकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत 31 मार्च 2024 अखेर एकूण 87,047 दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे.
-z यामध्ये सुमारे 84,007 इतक्या म्हणजेच सुमारे 96.50 टक्के दुकाने व आस्थापनांनी मराठीत नामफलक लावल्याचे आढळले. तर उर्वरित 3,040 ठिकाणी नियमानुसार फलक लावले नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली.
तर दीड लाखापर्यंत भुर्दंड पडणार
ग्लो साईन बोर्डला पालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. हा प्रकाशित फलक (ग्लो साईन बोर्ड) परकाना रद्द झाला तर नव्याने परवाना मिळविणे, फलक तयार करणे आदी बाबी लक्षात घेता, संबंधित आस्थापनाधारकांना किमान 25 हजार रुपयांपासून ते तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत खर्चाचा भुर्दंड बसणार असल्याचे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी सांगितले.
गडकिल्ले, महान व्यक्तीचे नाव बारला नको
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क’ (1)च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. यानुसार मद्यविक्रेत्या दुकानांनाही महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List