युक्रेनचा रशियाच्या अणू प्रकल्पावर हल्ला
रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या झापोरिझ्झिया अणू केंद्रावरील शटडाऊन अणुभट्टीवर युव्रेनने हल्ला केला. या हल्ल्यासाठी कोणते हत्यार वापरण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या अणू प्रकल्पावर हा ड्रोन हल्ला होता, असे रशियन सरकारी अणू एजन्सी रोसटोमने सांगितले. हल्ला झाला तेव्हा रेडिएशनची पातळी सामान्य होती आणि हल्ल्यानंतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, असे प्लांट अधिकाऱयांनी सांगितले. साईटवरील कॅन्टीनजवळ ड्रोन आदळल्यामुळे तीन व्यक्तींना दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List