ती डाळ भ्रष्टाचाराची, निलेश लंकेचा विखेंवर गंभीर आरोप

ती डाळ भ्रष्टाचाराची, निलेश लंकेचा विखेंवर गंभीर आरोप

लोकप्रतिनिधी हा विकास कामे करण्यासाठी असतो. मात्र यांचे अपयश झाकविण्यासाठी यांनी मतदारसंघात डाळ आणि साखर वाटली. मात्र ती वाटलेली डाळ देखील पुरवठा विभागाची भ्रष्टाचाराची असल्याची माहिती कळते. त्यामुळे लवकरच आपण त्याची चौकशी लावणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेद्वार निलेश लंके यांनी म्हटले आहे. तर डाळ अन् साखर वाटणाऱ्या खासदाराची गिनीज बुकात नोंद करावी, अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी लंके यांनी केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेद्वार मा. आमदार निलेश लंके यांची राहुरी तालुक्यामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे. यात्रेच्या सहाव्या दिवशी मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, म्हैसगाव, कानडगाव, निंभेरे, तांभेरे सोनगाव, सात्रळ आदी परिसरामध्ये निलेश लंके सह राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी लंके यांनी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत टिका केली की, गणेश सहकारी साखर कारखाना, डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना यांनी बंद पाडला. नगर चा उड्डाणपूल केल्याच्या बढाया मारतात पण तो उड्डाणपूल स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून झाल्याचे खुद्द नितीन गडकरी यांनी सांगिले आहे. तर जो नगर-मनमाड रस्ता आहे या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावे लागले तो रस्ता देखील करता आला नाही. कांद्याची निर्यात बंदी असेल किंवा दुधाचे भाव आणि त्याचे अनुदान असेल या कामात देखील त्यांना सपशेल अपयश आले मात्र स्वतःचे अपय झाकविण्यासाठी नको ते उद्योग हे लोक करत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;