नरेंद्र मोदींच्या वैचारिक पूर्वजांचेच ‘मुस्लिम लीग’ वर जुने प्रेम व सत्तेसाठी राजकीय आघाडी: नाना पटोले

नरेंद्र मोदींच्या वैचारिक पूर्वजांचेच ‘मुस्लिम लीग’ वर जुने प्रेम व सत्तेसाठी राजकीय आघाडी: नाना पटोले

काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे.काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप हास्यास्पद असून इतिहासाचा अभ्यास नाही हे स्पष्ट दिसते. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता तेव्हा जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी बंगाल, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांतात मुस्लिम लीगच्या सहकार्याने सरकार चालवत होते आणि चळवळ दडपण्याच्या सूचना देत होते. मुस्लीम लीगशी असलेल्या या जुन्या संबंधाचीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पुन्हा आठवण होत असावी, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेतून काँग्रेस व इंडिया आघाडीवर केलेल्या आरोपांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे सरकाराने केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मानाचे पान देणाऱ्या मोदींना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार? कार्पोरेट कंपन्यांना ब्लॅकमेल करुन तसेच ठेकेदारांना मोठी कंत्राटे देण्याच्या बदल्यात इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली केली, त्यावर नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? काँग्रेसने एकाच परिवाराचा विकास केला हा आरोपही तद्दन फालतु असून नरेंद्र मोदी यांनीच मागील 10 वर्षात केवळ अदानी परिवाराचाच विकास केला आहे हे सर्व जनतेला माहित आहे.

दलित, वंचित, आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबासाठी सरकारने मोठे काम केल्याची वल्गणा पंतप्रधान मोदींनी केली परंतु देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देतो यात कसला अभिमान व कसला विकास? ही तर अधोगती आहे. मोदी सरकारने 80 कोटी जनतेची 5 किलो धान्य देऊन 10 वर्ष केवळ लुट आणि लुटच केली आहे. गरिबांना उज्ज्वला योजना देऊन त्यांचे रेशनवरील रॉकेल बंद केले व गॅस सिलिंडरही महाग केला. मुंबईतील मेट्रोसह विविध मोठ्या प्रकल्पांची पायाभरणीच काँग्रेस सरकारने केली याची माहितीही पंतप्रधानांना नाही. समृद्धी महामार्ग व जलयुक्त शिवार योजनांचा गवगवा करताना या दोन्ही प्रकल्पात भ्रष्टाचार बोकाळला होता यातून कोणी मलई खाल्ली हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे.

काँग्रेस सरकारने दहशतवाद पोसला असा आरोप करताना पंतप्रधान मोदी भाजपा सरकारच्या काळातील दहशतवाद सोयीस्करपणे विसरले. जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अज़हर, अहमद ज़रगर आणि शेख अहमद उमर सईद या तीन दहशतवाद्यांना तत्कालीन वाजपेयी सरकारने सोडून दिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या तीन अतिरेक्यांना कंधारला सोडण्यासाठी खुद्द वाजपेयी सरकारचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह गेले होते. भाजपा सरकारच्या काळातच संसदेवर अतिरेकी झाला होता, पठानकोट एयरबेसवरील हल्लाही भाजपा सरकारच्या काळात झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 40 जवान शहिद झाले, त्याचा आजपर्यंत तपासही मोदी सरकार करु शकले नाहीत असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने दहशतवादावर बोलतात? असा प्रहार नाना पटोले यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;