काका गायब, पुतण्या मुंबईत! धाराशिवमध्ये महायुतीला कलहाचा संसर्ग

काका गायब, पुतण्या मुंबईत! धाराशिवमध्ये महायुतीला कलहाचा संसर्ग

धाराशिवमध्ये महायुतीला कलहाचा संसर्ग झाला आहे. अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच ‘खेकडाफेम’ मंत्री तानाजी सावंत मतदारसंघातून गायब झाले असून, त्यांचा पुतण्या धनंजय सावंत मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मुंबईत न्याय मागण्यासाठी ठाण मांडून बसला आहे.

धाराशिवमध्ये उमेदवार शोधता शोधता भाजपच्या तोंडाला फेस आला. सुरुवातीला प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चेत आणण्यात आले. त्यांचे नाव नुसतेच चर्चेत राहिले. त्यानंतर ही जागा आघाडीत अजित पवार गटाच्या माथी मारण्यात आली. परंतु अजितदादालाही उमेदवार मिळाला नाही. आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यांचा पत्ता फेकण्यात आला. परंतु या दोघांनी नकार दिल्याने भाजपचे आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. धाराशिवची जागा आम्हाला सोडा यासाठी तानाजी सावंत यांनी जंग जंग पछाडले. परंतु त्यांना ना भाजपने थारा दिला ना मिंध्यांनी. त्यामुळे सावंतांचा पतंग भरकटला. दिल्ली दरबारीही त्यांना दाद मिळाली नाही.

पुतणे तानाजी सावंत यांना उमेदवारी द्यावी यासाठी तानाजी सावंत यांनी आग्रह धरला आहे. त्यासाठी भैरवनाथ कारखान्यावर सावंत समर्थकांची बैठक झाली. त्यात अर्चना पाटील यांचे काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज धनंजय सावंत हे आपल्या समर्थकांसह तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;