Lok Sabha Election 2024 : सुजय विखे यांचा बॉडीगार्ड गौरव गर्जे व साथीदाराची शाहदेव पालवे यांना बेदम मारहाण
भाजपा महायुतीचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांचा बॉडीगार्ड गौरव गर्जे व साथीदाराने शाहदेव पालवे या व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. शाहदेव पालवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेला गेले होते म्हणून त्यांना विखेंच्या बॉडीगार्ड्सनी गजाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पालवे यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला तीन दिवस होऊन गेले तरीही अद्याप पर्यंत पोलिसांनी याची दखल घेतली नाही.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची सध्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रा नगर दक्षिण मतदार संघामध्ये सुरू आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला कशा पद्धतीने रोखता येईल हे आता विरोधक पाहू लागलेले आहेत. भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या अंगरक्षकानेच शाहदेव पालवे यांना लंके यांच्या यात्रेला जाऊ नको असे धमकावले होते. मात्र या धमकीला भीक न घालता पालवे हे यात्रेत सहभागी झाले होते. त्याचाच राग म्हणून सुजय विखे यांचा बॉडीगार्ड गौरव गर्जे व साथीदारांनी पालवे यांना लाकडी दांडक्याने, गजाने मारहाण केली. मी जरी तुला मारून टाकले तरी कोणालाच काही करता येणार नाही असा दम सुद्धा संबंधिताने दिला असल्याचे पालवे यांनी म्हणलेले आहे.
या संदर्भामध्ये पालवे यांनी लंके यांची जनसंवाद यात्रा ही गेल्यानंतर मी मजले चिंचोली गावामध्ये जात असताना मला गौरव गर्जे व ज्ञानेश्वर पालवे व अन्य दोन अज्ञात लोकांनी मला अडवून तू या यात्रेला का गेला असे म्हणत मारहाण केले असल्याचे सांगितले आहे. माझ्या पाठीला लागले असून मी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे तीन दिवस झाले तरीही कोणीही साधी फिर्याद घ्यायला सुद्धा आले नाही असे पालवे यांनी सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List