लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली होती शाहरुखची ही अभिनेत्री, अपघातात बिघडला सुंदर चेहरा

लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली होती शाहरुखची ही अभिनेत्री, अपघातात बिघडला सुंदर चेहरा

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा ही काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाच्या आधीच गर्भवती राहिल्या होत्या. त्यामुळे त्या खूप चर्चेत आल्या. त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री महिमा चौधरी. पहिल्याच चित्रपटात महिमाने चांगली प्रसिद्धी मिळवली होती. अभिनेत्री महिमा चौधरी आता इंडस्ट्रीतून गायब झाली आहे.

13 सप्टेंबर 1973 रोजी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये महिमाचा जन्म झाला होता. त्यानंतर तिने दिल्लीला शिक्षणासाठी येण्याआधीच सौंदर्याची स्पर्धा जिंकली होती. 1990 च्या दशकात तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. ज्यामध्ये आमिर खानसोबत केलेल्या पेप्सीच्या जाहिरातीचाही समावेश आहे. जी त्यावेळी खूप गाजली होती.

लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली होती महिमा

1997 मध्ये परदेस चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिग्दर्शक सुभाष घई यांनी तिला पाहताच चित्रपटाची ऑफर दिली होती. परदेस, दिल क्या करे, लज्जा, धडकन, दिल है तुम्हारा यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तिने काम केले.

महिमा चौधरीने 2006 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील वास्तुविशारद बॉबी मुखर्जीसोबत तिने लग्न केले होते. त्यावेळी ती प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. अनेक अभिनेत्रींनी आपली गर्भधारणा लपविण्यासाठी गुपचूप किंवा घाईघाईने लग्न केले आहेत.

बॉलीवूडमध्ये लग्नाआधीच प्रेग्नंट झालेल्या अभिनेत्रींची यादी मोठी आहे. यामध्ये श्रीदेवी, कोंकणा सेन शर्मा आणि सारिका हसन यांसारख्या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

महिमा चौधरीने तिच्या सुरेल आवाजाने आणि निरागस चेहऱ्याने चाहत्यांना वेड लावले होते. अभिनेत्री महिमा चौधरी आता ५० वर्षांची झाली आहे. महिमाने आयुष्यात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला ही झुंज दिली होती.

परदेस सिनेमा ठरला होता हिट

परदेश सिनेमासाठी दिग्दर्शकाने सुमारे तीन हजार मुलींची स्क्रीन टेस्ट घेतली होती. पण त्यांना तो चेहरा मिळत नव्हता. सुभाष घई यांची नजर महिमा चौधरीवर पडली आणि त्यांनी लगेच तिच्यासोबत सिनेमा साईन केला. या चित्रपटात शाहरुख खानसोबत महिमाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. उत्कृष्ट अभिनयासाठी महिमाला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता.

अपघातामध्ये चेहरा झाला खराब

दिल क्या करे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शूटिंगसाठी जात असताना महिमाच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी सुमारे 67 काचेचे तुकडे काढले होते. त्यामुळे तिचा चेहरा खूपच खराब झाला. त्यामुळे ती इंडस्ट्रीपासून दुरावली गेली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;