Lok Sabha Election 2024 – कुणाला शिट्टी तर कुणाला प्रेशर कुकर; कोणत्या पक्षाला मिळालं कुठलं निवडणूक चिन्ह?
राज्यात लवकरच लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी सोमवारी निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे. यात प्रेशर कुकर, शिट्टी, रोड रोलर, हत्ती, विळा-भोपळा अशी चिन्हं समाविष्ट आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात प्रेशर कुकर हे चिन्हं मिळालं आहे. परभणीत एकूण 34 उमेदवारांमध्ये लढत होणार असून परभणीतून लढणाऱ्या रासपच्या महादेव जानकर यांना शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक यांना रोड रोलर हे चिन्ह मिळालं आहे.
बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांना राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह असलेला हत्ती मिळाला आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार राजन क्षीरसागर यांना विळा भोपळा हे त्याच पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळालं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List