Lok Sabha Election 2024 – ED, CBI आणि NIA च्या प्रमुखांना हटवा; TMC ची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 – ED, CBI आणि NIA च्या प्रमुखांना हटवा; TMC ची निवडणूक आयोगाकडे मागणी

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सतत येत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगात तक्रार केली. ED, CBI, NIA आणि आयकर विभागाच्या प्रमुखांना हटवा, अशी मोठी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाबाहेर 24 तास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी सर्व नेत्यांना ताब्यात घेतले. भाजप केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करत आहे. निवडणूक आयोगाने तपास यंत्रणांच्या प्रमुखांना हटवून इतर पक्षांनाही समान संधी उपलब्ध करून द्यावी, असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या डोला सेन म्हणाल्या.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर तृणमूलचे धरणे आंदोलन

NIA च्या तपासावरून राजकारण सुरू आहे, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना अटक करवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप टीएमसीच्या नेत्यांनी केला.

एनआयएच्या नवीन महासंचालकांची नियुक्ती करण्यापूर्वी भाजपने निवडणूक आयोगाची मंजुरी घेतली होती का? यामुळे या नियुक्तीची चौकशी करावी. लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांसोबत भाजपचं साटंलोटं हे वाढत चाललं आहे, असा आरोप टीएमसी नेते साकेत गोखले यांनी केला.

Lok Sabha Elections 2024 – नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार, कारवाईची केली मागणी

भाजप नेतने जितेंद्र तिवारी यांनी 26 मार्चला एनआयएचे पोलीस अधीक्षक डीआर सिंह यांची भेट घेतली होती. आणि त्यातच दिवशी सदानंद दाते यांची एनआयएच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. कथितरित्या तिवारी यांनी एका ‘पॅकेट’सह सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीत जितेंद्र तिवारी यांनी टीएमसी नेते आणि कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यासाठी एक यादी दिली, असा आरोप टीएमसी नेते साकेत गोखले यांनी ट्विटमधून केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;