Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, संजय राऊत यांनी दिली माहिती

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, संजय राऊत यांनी दिली माहिती

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी सकाळी एक संयुक्त पत्रकार परिषद शिवालय येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, आपचे नेते, इतर घटकपक्षांचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

”महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात रणनीतीबाबत सर्व माहिता वरिष्ठ नेते देतील. जागावाटप झालेले आहे. मविआत काही मतभेद नाहीत. एखाद दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांचा अट्टहास असतो. यावेळी प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायला हवी. आम्ही कोल्हापूर, रामटेक, अमरावतीबाबत आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्याबाबत आमच्या लोकांनी जाहीर विधानं केली नाहीत. राष्ट्रवादी व काँग्रेसने संयमाची भूमिका घ्यायचे ठरवले आहे. सांगलीच्या जागी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे. त्याला राष्ट्रवादीने पाठिंबा देखील जाहीर केला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;