भैरवनाथ गडावर आगे मोहळातील मधमाश्यांनी केला पर्यटकांवर हल्ला, 13 जण जखमी

भैरवनाथ गडावर आगे मोहळातील मधमाश्यांनी केला पर्यटकांवर हल्ला, 13 जण जखमी

अकोले तालुक्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात विकेन्ड निमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या पुण्यातील कोथरूड येथील एका ट्रेकर्स ग्रुप्समधील पर्यटकांवर भैरवनाथ गडावरील आगे मोहळातील मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढवला झाले. ही हल्ल्याची घटना रविवारी 7 एप्रिल दुपारी दोन वाजता घडली. या हल्ल्यात ग्रुपमधील 13 तरुण-तरुणी जखमी झाले. तालुक्यातील राजूर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय लहामटे यांनी दिली.

हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर हा पर्यटकांसह अनुभवी व हौशी ट्रेकर्सना नेहमीचेच आकर्षण आहे. पुण्यातील कोथरूड येथील पर्यटकांचा एक ट्रेकर्सचा तरुण- तरुणींचा ग्रुप विकेन्डची संधी शोधून शनिवारी (6 एप्रिल) रात्री मिनीबसने अकोल्यातील आदिवासीबहुल कोथळा गावात आले. तेथे मारूती मंदिरात मुक्काम करून रविवारी (7 एप्रिल) पहाटेच्या सुमारास हा ग्रुप हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला पाचनई गावात पोहचला. तेथे हॉटेलमध्ये चहा-नाष्टा घेऊन त्यांनी सकाळी हरिश्चंद्रगडावरील कलाडगडावर ट्रेकिंग केले. तेथून दुपारी ते पाचनईत परतले. तेथे जेवण केले. नंतर ते हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यापाशीच असलेल्या कोथळेच्या शिवारातील भैरवनाथ गडावर ट्रेकिंगला निघाले.

भैरवनाथगड चढताना दुपारी दीडच्या सुमारास तेथील देवराईजवळ ते विश्रांतीस थांबले. तेथे कुडांजवळ आगे मोहळ लटकलेले होते. तरुणांनी दुपारी दोन वाजताच्या सुमारास परिसरातील गवत गोळा करून ते पेटवून तेथे धूर केला. त्यामुळे आगे मोहळातील मधमाश्या पोळ्यातून बाहेर पडल्या. मधमाश्या सैरभैर झाल्यावर त्यांनी उग्र रूप धारण केले. मोहातून बाहेर पडलेल्या अगणित मधमाश्यांनी या ग्रुपमधील तरुण-तरुणींवर जोरदार हल्ला चढविला. मधमाशांच यातरुण-तरुणींच्या हात, पाय व चेहऱ्यासह शरीरावर सर्वत्र असंख्य डंख मारून जखमी करताना त्यांची पळाता भुई थोडी झाली. जीव मुठीत धरून काहीजण कोथळा गावात पळाले.

दरम्यान, कोथळे गावकऱ्यांनी या घटनेची माहीती कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळ यांना मोबाईलवरून दिली. वनाधिकारी पडवळ यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून घेतली. ते काही ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांसह तत्काळ पाण्याच्या बाटल्या आणि इतर आवश्यक साहित्यासह कोथळा येथील भैरवनाथ गडावरील घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनीच मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमींना आधार दिला. तेथून जखमींवर प्रथमोपचार करून कोथळे गावात आणले. पाच ते सहा तरुणांना आंघोळ घातली. रुग्णवाहिकेतून जखमींना राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय लहामटे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचार केले. उपचारानंतर जखमींची प्रकृती स्थिर असून जखमींच्या नातेवाईकांना संपर्क साधून संपूर्ण माहीती कळविण्यात आली.

मधमाश्यांच्या हल्ल्यात शर्वरी धनंजय करवरकर (24), भार्गवी श्रीकांत कुलकर्णी (20), प्रज्ञा तुषार ढेरे (40), ममता मुकुंद भरताया (24), जयदेव सुनील पिंपरे (35), अक्षय माधव डोंगरे (42), नितीश अनिल बापट (37), अनिल अनिश बापट (34), अंकित किरण कुलकर्णी (30), अतुल सूर्यकांत कामटे (47), अंबरिश नारायण कान्होरे (31), स्मिता राजन दाबळे (31), अमोल विवेक नान्नल (23) या जखमींना दिले उपचार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;