खेळताना सिमेंटची बाकडे अंगावर पडून तीन मुलं जखमी, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील घटना

खेळताना सिमेंटची बाकडे अंगावर पडून तीन मुलं जखमी, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील घटना

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर प्रभागात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात परिसरात खेळाताना वजनदार जीर्ण झालेले सिमेंट काँक्रिटचे बाकडे अंगावर पडल्याने तीन चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली.

सदरची घटना रविवार 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली असून रिजवान रशीद सय्यद (10), वाहिद रशीद सय्यद (7) व मुस्कान (4) अशी जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. सुदैवाने यात मोठा अनुचित प्रकार घडलेला नाही. मुलांवर तातडीने उपचार सुरू आहेत असे वैद्यकीय अधिकारी गिरीश गुट्टे यांनी सांगितले.

सदर चिमुकल्यांची आई आजारी असल्याने त्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्याने चिमुकले त्यांच्या जवळच होते. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी व नागरिकांसाठी बसण्यासाठी असलेल्या बाकड्या जवळ सदर चिमुकले खेळत असताना बाकडे अंगावर पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या रुग्णालय कर्मचारी व नागरिकांनी त्या चिमुकल्याना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेले, डॉ. संजय उंबरकर यांनी गोळ्या औषध दिले, मात्र सदर चिमुकल्यांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी केला असून कोट्यावधी लाख रुपये निधी आला असे सांगितले जाते मग ते पैसे जातात कुठे, असं सवाल करीत त्यांनी यावेळी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत त्या चिमुकल्याच्या उपचाराची जबाबदारी घेण्याची तसेच पुन्हा अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी खराब जीर्ण झालेले सिमेंट काँक्रिटचे बाकडे हटविण्याची मागणी करत आपला रोष व्यक्त केला आहे. तसेच यावेळी वैद्यकीय अधीक्षक गिरीश गुट्टे यांना सदर प्रकाराबाबत व चिमुकल्यांच्या तब्येत विषयी विचारांना केली असता त्यांनी मुलांची तब्येत आता चांगली आहे व सुधारत आहे असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;