केजरीवालांना पदावरून हटवण्याची याचिका; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले

केजरीवालांना पदावरून हटवण्याची याचिका; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अटकेत आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने या याचिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना सुनावले आहे. अशा याचिका फक्त लवकर लोकप्रियता मिळवण्यासाठी करण्यात येतात. त्यामुळे अशाप्रकारच्या याचिका करणाऱ्यांना दंड लागू करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला.

अरविंद केजरीवाल अटकेत असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यावे, अशी याचिका आपचे निलंबित नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री संदीप कुमार यांनी दाखल केली होती. न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या पीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. न्यायालयाने याआधी अशाच प्रकारची मागणी करणाऱ्या दोन याचिका फेटाळल्या आहेत. असे असतानाही संदीप कुमार यांनी पुन्हा अशीच याचिका दाखल केल्याने न्यायालयाने संदीप कुमार यांना फटकारले आहे.

अशा याचिका जनहित याचिका नसून फक्त लोकप्रियता मिळवण्याच्या हेतून दाखल केल्या असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे अशा याचिकाकर्त्यांना दंड लावायला हवा, असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले. तसेच ही याचिका न्यायाधीश मनमोहन यांच्या पीठाकडे पाठवण्यात आली आहे. मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने याआधी अशाच याचिकांची सुनावणी केली आहे, त्यामुळे ही याचिकाही त्यांच्या पीठाकडे पाठवण्यात आली आहे.

केजरीवाल यांना पदावरून हटवण्याबाबत याआधी दोन याचिका करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने त्या फेटाळल्या होत्या. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही. केजरीवाल यांना पदावर राहायचे की पद सोडायचे याचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. तसेच दिल्लीत काही संवैधिनुक संकट ओढवले तर दिल्लीचे उप राज्यापाल किंवा राष्ट्रपती योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे न्यायालय याबाबत कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;