Pushpa 2 The Rule Teaser : अल्लू अर्जूनच्या वाढदिवसा दिवशी टीझर रिलीज

Pushpa 2 The Rule Teaser : अल्लू अर्जूनच्या वाढदिवसा दिवशी टीझर रिलीज

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जूनचा बहुप्रतिक्षित पुष्पा 2 द रुलचा टीझर सोमवारी रिलीज झाला. अल्लू अर्जूनच्या 42 व्या वाढदिवसा दिवशी हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ‘पुष्पा द राइज’च्या भरगोस यशानंतर पुष्पा 2 ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 500 कोटींचे बजेट असलेला पुष्पा 2 द रुल 15 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पुष्पा 2 द रुल चा टीझर सगळीकडे धुमाकुळ घालत आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जूनचा चित्रपटातील लूक रिव्हील केला आहे. यामध्ये तेलंगणातील हिंदू आदिवासी लोकांच्या देवतांचा उत्सव जथाराने दाखविण्यात आला आहे. अल्लू अर्जून एका सुंदर निळ्या रंगाच्या पट्टू साडीमध्ये दिसत आहे. त्याच्या या लूकसोबत त्याचा पुष्पा स्टाईल आयकॉनिक फाइट सीन देखील दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत, रश्मिका आणि फहद फासिल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर जगपती बाबू, अनसूया भारद्वाज, धनंजय, अजय यांसारखे कलाकार देखील आहेत. पुष्पा द राइज मधील भूमिकेसाठी अल्लू अर्जून राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;