Surya Grahan 2024 – 54 वर्षांतले सर्वात मोठे सूर्यग्रहण, ‘या’ भागांमध्ये 4 मिनिटे असेल अंधार

Surya Grahan 2024 – 54 वर्षांतले सर्वात मोठे सूर्यग्रहण, ‘या’ भागांमध्ये 4 मिनिटे असेल अंधार

आज लागणारे सूर्यग्रहण हे वर्षातले पहिले आणि मागच्या 54 वर्षांतले सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. हिंदुस्थानात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. उत्तर अमेरिकेच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण दिसेल आणि चार मिनिटे 9 सेकंद या ठिकाणी पूर्ण अंधार असेल. दरम्यान, नासाच्या वैज्ञानिकांनी यावेळी अनेक प्रयोग करण्याच्या योजना आखल्या आहेत.

अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात सूर्यग्रहणाबाबत लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि लोकांनी हे सूर्यग्रहण पाहाण्यासाठी वेगवेगळी तयारी केली आहे. आज लागणारे सूर्यग्रहण कॅनडा, अमेरिकेपासून मॅक्सिकोपर्यंत दिसेल. हे सूर्यग्रहण हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटांपासून मध्यरात्री 2 वाजून 22 मिनिटांपर्यंत होणार. मात्र 5 तास 10 मिनिटे चालणारे हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही.

हे सूर्यग्रहण 5 तास 10 मिनिटांचे असणार आहे. 4 मिनिटे 9 सेकंद पूर्ण सूर्यग्रहण असणार. हे सूर्यग्रहण कॅनडा, उत्तर अमेरिका, मॅक्सिको, कोस्टारिकामध्ये पाहिले जाऊ शकते. सोबत क्यूबा, डोमिनिका, फ्रेन्च पोलिनेशिया, जमैका या भागात दिसणार आहे. दक्षिण प्रशांत महासागरापासून ग्रहणाला सुरुवात होणार. सर्वात जास्त वेळ चालणाऱ्या या ग्रहणासाठी नासाने खास तयारी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;