Delhi Liquor Policy : BRS नेत्या के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला, मुलाच्या परीक्षेसाठी मागितला होता जामीन
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांना दिल्ली राऊज एव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. कथित दिल्ली मद्य धोरण मनी लाँड्रींग प्रकरणात के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. न्यायालयात जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
आपल्या मुलाची परीक्षा असल्याने के. कविता यांनी अंतरिम जामीन मागितला होता. कविता यांच्या मुलाची एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू होणार आहे. त्यांच्या 16 वर्षीय मुलाला परीक्षेदरम्यान आईची गरज आहे. आईची कमी भाऊ आणि वडील पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन मिळण्याची मागणी कविता यांच्या वकीलांनी केली होती. याआधी के. कविता यांच्या अंतरिम जामिनावर 4 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने आज निर्णय देत जामीन फेटाळला आहे.
के. कविता यांनी शनिवारी केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीविरोधात न्यायालयात धाव घेतली. केंद्रीय तपास यंत्रणेला चौकशीसाठी दिलेली परवानगी मागे घेण्याची विनंती, के. कविता यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कथित मद्य धोरण प्रकरणात भ्रष्टाचाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी 10 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List