त्या भूमिकेमुळे मला गुदमरल्यासारखं..; ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा खुलासा

त्या भूमिकेमुळे मला गुदमरल्यासारखं..; ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा खुलासा

कुणाल खेमूच्या ‘मडगाव एक्स्प्रेस’मध्ये झळकलेला अभिनेता दिव्येंदूला ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने साकारलेल्या मुन्ना भैय्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी ‘मिर्झापूर’च्या दुसऱ्या सिझनच्या अखेरीस जेव्हा मुन्ना त्रिपाठीची हत्या दाखवली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर 3’ची घोषणा झाली, तेव्हा मुन्ना भैय्याच्या भूमिकेविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झाले. मात्र तिसऱ्या सिझनमध्ये झळकणार नसल्याचं दिव्येंदूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं. ‘मिर्झापूर’मध्ये साकारलेल्या मुन्ना भैय्याच्या भूमिकेचा स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम झाल्याचं त्याने सांगितलं.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्येंदू म्हणाला, “मला आता हे सांगितलं पाहिजे की मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनमध्ये माझी भूमिका नाही. जेव्हा मी ती भूमिका साकारत होतो, तेव्हा त्याचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्त्वावर खूप झाला. एखाद्या भूमिकेत खोलवर जाण्याचं आपण फार समर्थन केलं नाही पाहिजे. कारण ते सोपं नसतं. कधीकधी माझ्यासाठी ती गोष्ट खूपच नकारात्मक ठरायची. मला गुदमरल्यासारखं वाटायचं. हे इतकं क्लिष्ट असतं की तुम्हाला कळतंही नाही की तुम्ही त्या विशिष्ट झोनमध्ये गेला आहात. जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडता, तेव्हा तुम्हाला समजतं की ते किती नकारात्मक होतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karishma Mehta🇮🇳 (@karimehta05)

‘मिर्झापूर’ या पॉलिटिकल क्राइम थ्रिलर सीरिजमध्ये दिव्येंदूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सीरिजचा पहिला सिझन ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 2020 मध्ये या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या वर्षी जून महिन्यापासून तिसऱ्या सिझनसाठी शूटिंग सुरू आहे. आता या वर्षी ‘मिर्झापूर 3’ प्रदर्शित होणार आहे. मार्च महिन्यात या तिसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली होती. यावेळी सीरिजमधील सर्व कलाकार उपस्थित होते. या सीरिजमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी शर्मा यांच्या भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;