मेहमूद यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर अरुणा ईरानी यांनी दिलं उत्तर

मेहमूद यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर अरुणा ईरानी यांनी दिलं उत्तर

ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईरानी यांना वेगळ्या कोणत्या ओळखीची गरज नाही. त्यांना आपल्या सहा दशकाच्या करिअरमध्ये जवळपास 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. आजसुद्धा त्या इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अरुणा ईरानी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आल्या आहेत. एकेकाळी त्यांचं नाव मेहमूद यांच्याशी जोडलं गेलं होतं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता बऱ्याच वर्षांनंतर अरुणा यांनी त्यावर मौन सोडलं आहे. त्याचसोबत त्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे. मेहमूद यांना गुरू मानत असल्याचं अरुणा यांनी स्पष्ट केलं.

‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरुणा ईरानी म्हणाल्या, “मी आणि मेहमूद यांनी सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी मला कॉमेडी शिकवली. मी त्यांना माझे गुरू मानायची. जेव्हा ‘कारवां’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले, तेव्हा अफवा पसरली होती की मी आणि मेहमूद यांनी गुपचूप लग्न केलं. मात्र असं काहीच नव्हतं. या गैरसमजुतीमुळे मला अनेक वर्षांपर्यंत काम मिळालं नाही. यात माझी हीच चूक होती की त्यावेळी मी कोणाला स्पष्टीकरण देणं गरजेचं समजलं नाही. माध्यमांना बोलावून आम्हाला त्या सर्व चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट करायला पाहिजे होतं.”

याविषयी अरुणा ईरानी पुढे म्हणाल्या, “आमच्या अफेअरच्या चर्चांनंतर मी आणि मेहमूद यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. एकेदिवशी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की या अफवांमुळे माझं रोज पत्नीशी भांडण होतंय. आता आपण एकत्र काम केलं नाही तर बरं होईल. त्यांच्या पत्नीने त्यांना माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.”

अरुणा ईरानी एका जुन्या मुलाखतीत मेहमूद यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “मी चुका केल्या, पण तो आता भूतकाळा आहे. कदाचित ते माझ्या लायक नव्हते किंवा मी त्यांच्या लायक नव्हती. पण आमच्यात खूप चांगली मैत्री होती. तुम्ही याला आकर्षण म्हणा किंवा मैत्री. पण आम्ही कधीच एकमेकांशी लग्न केलं नव्हतं किंवा आमच्यात प्रेमसुद्धा नव्हतं. लोकांनी आमच्या नात्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं”, असं त्या म्हणाल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;