महायुतीच्या अडचणी वाढल्या; प्रचार करणार नसल्याची आरपीआयची ठाम भूमिका
महायुतीचे जागावाटप अद्याप ठरत नसून अनेक जागांवर त्यांचे घोडे अडले आहे. त्यामुळे महायुतीत आलबोल नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता आरपीआयने (आठवले गट) महायुतीच्या अडचणी वाढवल्या आहेत. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. रिपब्लिकन पक्षाच ठरलं…! या शीर्षकाखाली आरपीआयने प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये आता आरपीआय (आठवले) पक्षाने निवडणुकीमध्ये आता महायुतीचा प्रचार करायचा नाही, तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवून द्यायची, असं म्हणत त्यांनी भाजपासह स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे. शिर्डी व नगर दक्षिण मतदार संघातील दोन्ही उमेदवारांचा दारुण पराभव करण्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे व व नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
असे आहे पक्षाचे पत्रक
रिपब्लिकन पक्षाच ठरलं…!
रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये जो पराभव पत्करावा लागला. शिर्डी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच ठरलं… महायुतीचे मेळावे, मीटिंग, सभेमध्ये रिपाईचा कार्यकर्ता, नेता गेल्यास त्याची हकालपट्टी करण्याचं ठरलं..रामदास आठवलेचा विश्वासघात करणाऱ्यांचा विरोधात मतदारसंघात प्रचार करायचं ठरलं…रामदास आठवलेचा अपमान म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचा अपमान. त्या अपमानाचा बदला घेण्याच ठरलं…तोंडावर गोड बोलून देवेंद्र फडणवीसांना आठवले साहेबांच्या विरोधात पत्रव्यवहार करणाऱ्याचा पर्दापाश करायचं ठरलं…पैशाची भाषा बोलून रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता खरेदी करू पाहणाऱ्यांचे पैसे नाकारण्याच ठरलं.. रामदास आठवलेच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांचे पुतळे न जाळता मतपेटीतून जलवा दाखवायचं ठरलं. इतर वेळेस नाही परंतु स्वतःच्या हितासाठी रामदास आठवलेच बॅनर वर फोटो टाकणाऱ्याला जबाब विचारायचं ठरल…शिर्डीला नगर दक्षिण मतदार संघातील दोन्ही उमेदवारांचा दारुण पराभव करण्याचं ठरलं…2009 च्या निवडणुकीत रामदास आठवलेचा पराभव लोणीकरांनीच केला होता, त्या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधीच सोन करायचं ठरलं… रिपब्लिकन पक्षाचा अस्तित्वाचा लढा लोकसभेपुरताच मर्यादित नसून शिर्डी विधानसभेतही दाखवण्याचं ठरलं…
असा मजकूर या पत्रकात आहे. हे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या पत्राचे राजकीय पडसाद उमटत आहेत. त्यामुळे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे व व नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. आरपीआयच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List