नगर मध्ये ईडीची सर्वात मोठी कारवाई ! ‘त्यांच्या’ करोडोंच्या मालमत्ता केल्या जप्त
सक्तवसुली संचालनालयान अर्थात ईडीने नगर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून करोडोंची फसवणूक झाली असून साधारण ही गुंतवणूकदारांची फसवणूक सुमारे 125 कोटींची असल्याची माहिती मिळाली आहे.
मूळ नगर जिल्ह्यातील रहिवासी व सध्या दुबईत राहणारे विनोद खुटे याच्यावर ही कारवाई झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीस् ग्रुप-ग्लोबल अॅफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित 8 कोटी 98 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यामध्ये पुण्यातील पाच सदनिका, दोन सभागृह, दोन कार्यालये, नगर येथील जमिनीचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत 70 कोटी 89 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असून, चौकशी सुरू आहे. पुण्यातील पाच सदनिका, दोन सभागृह, दोन कार्यालये व नगर येथील दोन हेक्टर जमीन यावर ईडीने टाच आणली आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडाधे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी दुबईत वास्तव्याला असलेला विनोद खुटे असून, त्याने दुबईस्थित कंपनी मेसर्स काना कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टो एक्स्चेंज नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये पुणे येथील 366.92 स्क्वेअर मीटरचे पाच फ्लॅट्स असून 139.39 स्क्वेअर मीटरचे दोन मल्टीपर्पज हॉल, 366.92 स्क्वेअर मीटरचे दोन ऑफिस यांचा समावेश असून नगर जिल्ह्यातील 8.98 कोटींच्या 2 हेक्टर जागाही समाविष्ट आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List