निवडणूक रोखे हा भाजपचा सर्वात मोठा घोटाळा; आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल

निवडणूक रोखे हा भाजपचा सर्वात मोठा घोटाळा; आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल

निवडणूक रोखे हा भाजपने केलेला सर्वात मोठा घोटाळा आहे. अनेक कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला असतानाही त्यांनी भाजपला निवडणूकीसाठी देणगी दिली. त्यामुळे भाजपने या रोख्यांद्वारे मोठा घोटाळा केल्याचे उघड होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे अवैध ठरवत त्याची माहिती मागवल्यामुळे हा मोठा घोटळा उघड झाला आहे, असेही संजय सिंह यांनी सांगितले.

भाजपने रोखे देण्याच्या बदल्यात अनेक कंपन्याना करार दिले. तसेच छापे पडलेल्या कंपन्यांनी रोखे दिल्यानंतर त्यांच्याविरोधातील कारवाई थंड बस्त्यात गेली. हे सर्व आता उघड झाले आहेत. तसेच अनेक कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला असतानाही त्यांनी भाजपला निवडणुकीसाठी मोठ्या रकमेची देणगी दिली. या माध्यामातून भाजपने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयामुळे हा मोठा घोटाळा उघडकीस आला असून आपल्याला न्यायालयाला धन्यवाद देण्याची गरज आहे. 33 कंपन्यांना एक लाख कोटींचे नुकसान झाले होते. त्यांनीच भाजपला 450 कोटी एवढ्या मोठ्या रकमेची देणगी दिल्याचे सिंह यांनी सांगितले. तर एका कंपनीने आपल्या नफ्यापेक्षा 93 पट जास्त देणगी भाजपला दिल्याचा दावाही त्यांनी केला. 6 कंपन्यांनी भाजपला 600 कोटींची देणगी दिला. त्यातील 17 कंपन्यांनी करही भरला नसल्याचे सिंह यांनी सांगितले. कंपन्यांकडून मोठी देणगी घेत त्यांना करात सवलत देत तसेच त्यांना मोठे कंत्राट देत भाजपने मोठा घोटाळा केला आहे, असे सिंह यांनी सांगितले.

देशात एवढा मोठा घोटाळा झाला असतानाही ईडी, सीबीआय आता गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला. एखाद्या कंपनीला तीन वर्षात नफा झाला असेल तर त्यातील 7 टक्केच निवडणूक देणगी देता येऊ शकते, असा नियम आहे. त्यामुळे तोट्यातील कंपनी एखाद्या पक्षाला देणगी देऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. तरीही कोट्यवधींचा तोटा असलेल्या कंपन्यांनी भाजपला देणगी दिली आहे. यातील अनेक कंपन्या फक्त कागदावरच असल्याचा दावाही सिंह यांनी केला. आमच्यावर कारवाई करताना ईडी, सीबीआय पहेलवान असतात, मात्र, भाजपसमोर त्यांना मूग गिळून गप्प बसावे लागते. मात्र, या संस्था जनतेच्या पैशांनी चालवल्या जात आहेत, असेही सिंह म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;