लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, अधिकाऱ्यांचे आवाहन; शिंदोलावासी निवडणूक बहिष्कारावर ठाम

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, अधिकाऱ्यांचे आवाहन; शिंदोलावासी निवडणूक बहिष्कारावर ठाम

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिंदोळा येथील ग्रामस्थांनी एक बैठक घेत आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या लोकसभा, विधानसभेसह पुढील सर्व निवडणुकांवर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील हनुमान मंदिराजवळ झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्व पक्षांनी निवडणुकीचे मैदानात उतरण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे असले तरीदेखील राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तब्बल 65 गावातील 41 हजार 440 मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील एका गावाने मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शिंदोला ग्रामवासीयांनी आपल्या मागण्यांसाठी या आधीही ग्रामपंचायत निवडणुकांवर ग्रामपंचायत निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार घातला होता. त्यावेळी शासनाचे अधिकारी, उपविभागिय अधिकारी डॉ. शरद जावळेकर, एसडीपिओ संजय पुजलवार, शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली होती. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांना अधिकारी वर्गाने केले होते. मात्र, जोपर्यंत 331 शेतकऱ्यांचा जमिनीचा निकाल लागणार नाही, तोपर्यंत आम्ही बहिष्काराच्या निर्णयावर ठाम आहोत, असे ग्रामस्थांनी शासन व अधिकाऱ्यांना सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीवर जाहीर बहिष्कारचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता.

शिंदोला येथील शेती ही माहुर देवस्थानची असून येथील शेतीवर मिळणाऱ्या सुविधांपासून ग्रामस्थ वंचित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ही जमीन पिढीजात वाहत असून शासनाला वेळोवेळी निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांना शेतीवर बँक कर्ज घेण्यासाठी तसेच यावर 7/12 वर देखील 1957 चे कूळदेखील शासनाने काढले आहे. सात बारावर शेतकऱ्यांचे नाव येत नाही. याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नसल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जमीनी नावावर होणे, शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता आला पाहिजे, याबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा ग्रामवासी येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान सभा, लोकसभा, बाजार समिती व इतर संस्थांनच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याचे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले.

या बहिष्कारासंदर्भात वणीचे तहसीलदार निखिल धुळधाळ यांच्याशी संपर्क केला असता अद्याप या ग्रामवासीनाकडून बहिष्कार संदर्भात कोणतेही लेखी निवेदन नसल्याचे सांगितले . तरीही आम्ही नोडल अधिकाऱ्याला या संबंधित विस्तृत माहिती घेण्यासाठी पाठविलेले असल्याचे सांगितले . तसेच निवडणुकीवर बहिष्कार न टाकण्याचे सर्व नागरिकांना आवाहन देखील केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;