भरदिवसा महिलेवर हातोडीने हल्ला; साताऱयातील घटनेने खळबळ

भरदिवसा महिलेवर हातोडीने हल्ला; साताऱयातील घटनेने खळबळ

 पोकई नाका परिसरात असणाऱया मरीआई महालक्ष्मी व्यापार संकुलाच्या पाठीमागील रस्त्यावर हेल्मेट घालून आलेल्या एकाने महिलेवर हातोडीने हल्ला केला. हातोडी डोक्यात लागल्याने जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर धावत आलेल्या नागरिकांनी हल्लेखोरास पकडण्याचा प्रयत्न केला. याकेळी पळण्याच्या प्रयत्नात पडल्याने हल्लेखोर जखमी झाला. हल्लेखोर जखमी महिलेचा नातेकाईक आहे.

रविवार पेठेत राहणारी महिला दुपारी 12च्या सुमारास मरीआई महालक्ष्मी संकुलाच्या पाठीमागील रस्त्याने फोनवर बोलत निघाली होती. यावेळी तिच्याजवळ एक हेल्मेट घातलेली व्यक्ती आली. त्याच्या हातात हातोडी होती. त्याने फोनवर बोलणाऱया महिलेच्या डोक्यात हातोडी मारली. हातोडी डोक्यात बसल्याने महिला जखमी झाली व तिने आरडाओरडा केला. तिचा आकाज ऐकून तेथे मोठी गर्दी जमली. नागरिकांना सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. पोलीस येईपर्यंत जमलेल्यांनी हल्लेखोरास थांबकून ठेकण्याचा प्रयत्न केला. जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात हल्लेखोर पडून जखमी झाला. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या महिलेचे नातेवाईक आले. हल्लेखोर महिलेचा जकळचा नातेवाईक असून, पैशांच्या कादातून त्याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

नकीन हेल्मेट, हातोडी

हल्ला करणाऱयाने त्या महिलेवर पाळत ठेवली होती. हल्ला केल्यानंतर ओळख पटू नये, यासाठी त्याने नवीन हेल्मेट, हातमोजे आणि नवीन हातोडी खरेदी केली होती. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, हल्लेखोर हल्ला केला तेव्हा नशेत असल्याचे पोलिसांचे मत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;