महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार
गेला मार्च हॉट गेला. आता एप्रिल महिना आणखी तापदायक ठरत आहे. महाराष्ट्रासह तब्बल आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पारा 43 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर मुंबईत पारा 33 ते 34 डिग्री सेल्सिअस इतका नोंदवला गेला. दरम्यान, पुढील चार दिवस म्हणजेच 10 एप्रिलपर्यंत 14 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये पारा 43 अंशांवर पोहोचला आहे. शनिवारी आंध्र प्रदेशात पारा 44.4 डिग्री सेल्सिअस नोंदवला गेला.
केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List