शाहू छत्रपतींची संवेदनशीलता; अपघातग्रस्त तरुणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये केले दाखल

शाहू छत्रपतींची संवेदनशीलता; अपघातग्रस्त तरुणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये केले दाखल

 प्रचाराच्या गडबडीत एक सभा उरकून दुसऱया सभेला जात असताना वाटेत झालेल्या अपघातग्रस्त युवकाला आपल्या वाहनातून रुग्णालयात वेळेत उपचारांसाठी दाखल करून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दाखविलेली संवेदनशीलता सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे शनिवारी (6 रोजी) गडहिंग्लज तालुक्यात प्रचारदौऱयावर होते. कानडेवाडी येथील सभा आटोपून ते गडहिंग्लजकडे सभेसाठी निघाले असता, वाटेतील रस्त्यावर अपघात झाल्याचे त्यांना दिसले. या अपघातात दुचाकीस्वार युवक जखमी झाला होता. महाराजांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले. शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी जखमीची विचारपूस केली. जखमीची अवस्था पाहून महाराजांनी त्याला आपल्या ताफ्यातील गाडीत घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांशी संवाद साधून त्या युवकावर योग्य उपचार करण्याच्या सूचना करीत महाराज गडहिंग्लजच्या सभेसाठी रवाना झाले. महाराजांनी दाखविलेली संवेदनशीलता सर्वांनाच भावली.

राजशिष्टाचारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱयांना चपराक

गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत शाहू महाराजांच्या राजशिष्टाचारासंदर्भात काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह उपस्थित करून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, गडहिंग्लज येथील एका अपघातग्रस्त युवकाला रुग्णालयात दाखल करण्याबाबत श्रीमंत शाहू महाराजांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे श्रीमंत शाहू महाराजांच्या राजशिष्टाचारासंदर्भात सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱया समाजकंटकांना सणसणीत चपराक बसली आहे. यापूर्वीही शाहू महाराजांनी जातीय, धार्मिक दंगल थांबविण्यासाठी स्वतः पुढाकार घेत समाजमन जपण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आंदोलनातही स्वतः जाऊन रस्त्यावर खर्डा-भाकरी खाऊन हिंसक होणारे आंदोलन शांततेने होण्यास मदत केली आहे. अशा अनेक प्रसंगांत श्रीमंत शाहू महाराजांनी कधीही राजशिष्टाचाराची पर्वा केली नाही की जनतेलाही कधी हा राजशिष्टाचार अडथळा ठरला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;