काय सांगता…उंदिरांनी 19 किलो गांजा आणि भांग फस्त केली; पोलिसांचा अजब दावा

काय सांगता…उंदिरांनी 19 किलो गांजा आणि भांग फस्त केली; पोलिसांचा अजब दावा

झारखंडमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. धनबाद येथून एका आरोपीकडून जप्त करून गोदामात ठेवलेला 10 किलो गांजा आणि नऊ किलो भांग चक्क उंदराने खाल्ल्याचा अजब दावा पोलिसांनी केला आहे. आता धनबाद पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

शंभू अग्रवाल आणि त्याच्या मुलाकडून 14 डिसेंबर 2018 साली 10 किलो गांजा आणि 9 किलो भांग जप्त करत दोघांना अटक केली होती. दरम्यान हा जेव्हा खटला सुरू झाला त्यावेळी प्रधान आणि सत्र न्यायाधिश राम शर्मा यांच्या न्यायालयाने तपास अधिकारी जयप्रकाश प्रसाद यांना जप्त केलेले साहित्य दाखवण्याचे निर्देश दिले होते. मात्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पोलिसांनी जप्त केलेले साहित्य सादर करता आले नाही. त्यांनी ते साहित्य उंदरांनी खाल्ल्याचे न्यायालयात सादर केले. जप्त केलेले साहित्य उंदरांनी नष्ट केल्याचे तपास अधिकाऱ्याने 6 एप्रिल रोजी नोंदवले.

शंभू आणि त्यांच्या मुलाच्या वकिलांनी इंडिया टु़डे टिव्हीला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शंभू आणि त्याच्या मुलावर खोट्या प्रकरणात अडकवले आहे. या प्रकरणात अभय भट्ट यांच्या म्हणण्यानुसार कायदा हा पुराव्यांवर आधारित असतो आणि पोलीस जप्त केलेले साहित्य का सादर करू शकले नाहीत असा प्रश्नही विचारला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश धनबाद पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;