प्राजक्ता माळीने नावात केला मोठा बदल; म्हणाली, ‘आयुष्यात वडिलांचं नाव..’

प्राजक्ता माळीने नावात केला मोठा बदल; म्हणाली, ‘आयुष्यात वडिलांचं नाव..’

शासकीय कागदपत्रांवर उमेदवाराचं नाव त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम नोंदविण्याचं बंधनकारक करणारा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. 1 मे 2024 रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद अशा पद्धतीने केली जाईल. त्यात आईचं नाव बंधनकारक असेल. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत प्रचलित पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचं म्हणजे तिचं नाव नंतर तिच्या पतीचं नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येईल. बाल व महिला विकास विभागाच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या निर्णयानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर आईचं नाव जोडत स्वत:चं पूर्ण नाव लिहिलं आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट-

‘नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी. काय झालं? अहो.. हो हो बरोबर नाव ऐकलं तुम्ही. आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे. अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट. धन्यवाद अदिती तटकरे,’ असं तिने लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे उगाच आता किती प्रोग्रेसिव्ह दाखवणार नाटक,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘भावनिक होऊन विचार केल्यावर आपल्याला नेहमी आईच श्रेष्ठ वाटते, नकळत बापाचं स्थान आपण कमी करतो,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘नसती उठाठेव.. स्टंटवाले निर्णय घ्यायचे आणि हवा करायची. प्रत्येकाची आई प्रत्येकाला प्रिय असते. त्यासाठी हे असले उपक्रम कशाला, नावासाठी फक्त?,’ अशा शब्दांत एका युजरने टोला लगावला.

जन्म मृत्यू नोंदवहीत नोंद करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्र सरकारची परवानगी घेऊन आईच्या नावाची नोंद करण्यात यावी असाही निर्णय घेण्यात आला आहे. घटस्फोट महिलांच्या मुलांना वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावण्याची परवानगी या निर्णयात देण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;