मणिपुरात मदत छावण्यांमध्ये मतदान केंद्रे
वांशिक हिंसाचारामुळे घरदार सोडून विस्थापित झालेल्या मणिपुरी जनतेला मदत छावण्यांमधून मताधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यवस्था करत आहे. मणिपूरमध्ये 19 आणि 26 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार असून, 24 हजारांहून अधिक विस्थापित लोक मदत शिबिरांमधून मतदान करतील.
मदत छावण्यांमधील मतदानास पात्र असलेल्या 24,500 हून अधिक विस्थापितांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रदीप कुमार झा यांनी सांगितले. राज्यात एकूण 2,955 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List