मालमत्ता कर भरलेले 38 चेक झाले बाऊन्स; पालिकेने खेचले न्यायालयात, 853 मालमत्ताधारकांचे धनादेश वटले

मालमत्ता कर भरलेले 38 चेक झाले बाऊन्स; पालिकेने खेचले न्यायालयात, 853 मालमत्ताधारकांचे धनादेश वटले

मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेला दिलेले तब्बल 38 चेक बाऊन्स झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत पालिकेने संबंधितांना न्यायालयात खेचले आहे.

मालमत्ताधारकांना कर भरणे सोयीचे क्हाके यासाठी रोखीने देयक जमा करण्यासोबतच धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन पद्धत ही सुविधा उपलब्ध केली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात धनादेशाद्वारा करभरणा केलेल्या 892 प्रकरणांत प्रत्यक्षात धनादेशांचा अनादर झाल्याचे आढळून आले. यात एकूण 43 कोटी 54 लाख रुपयांचा मालमत्ता कर अपेक्षित होता. धनादेशाचा अनादर झाल्याने या 892 मालमत्ताधारकांना पालिकेच्या वतीने परक्राम्य संलेख अधिनियम – 1881 नुसार नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर 853 मालमत्ताधारकांनी एकूण 37 कोटी 83 लाख रुपयांचा करभरणा केला, मात्र नोटीस बजावल्यानंतर करभरणा करण्यात कुचराई करणाऱ्या उर्वरित 38 मालमत्ताधारकांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण 5 कोटी 71 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;