गोखले ब्रिजवर मेअखेर बसवणार दुसरा गर्डर
अंधेरीच्या गोखले ब्रिजच्या दुसऱ्या गर्डरच्या 32 भागांपैकी पाच भाग आणले गेले आहेत. उर्वरित सर्व भाग येत्या 20 ते 22 एप्रिलपर्यंत आणले जाणार असून दुसऱ्या बाजूचा गर्डर मेअखेरपर्यंत बसवण्यात येणार आहेत.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाच्या दुसऱया बाजूच्या गर्डरचे काही भाग मुंबईत दाखल झाले आहेत. पंजाब, हरियाणा, अंबाला येथील कारखान्यात गर्डरचे भाग तयार करण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनामुळे गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला असला तरी आता दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सुट्टे भाग मुंबईत दाखल झाल्याने गोखले पुलाच्या कामाला वेग येईल, असा विश्वास पालिकेच्या पूल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
गर्डरचे एकूण 32 भाग असून त्यापैकी 5 भाग गुरुवारी मुंबईत आले आहेत. उर्वरित 27 भाग पुढील पंधरा ते वीस दिवसांत टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. पुलाच्या जागेवर या सुटय़ा भागांची जोडणी करून गर्डर बनवून तो पुलावर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱयांकडून देण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List