कट्टर महिला माओवाद्यांना अटक

कट्टर महिला माओवाद्यांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी विशेष मिशन हाती घेऊन दोन कट्टर माओवाद्यांना बेडय़ा ठोकल्या. काजल ऊर्फ सिंधू गावडे आणि गीता ऊर्फ सुकळी कोरचा अशी त्या दोघींची नावे आहेत. तर जन मिलिटियाचा सक्रिय सदस्य पिसा पांडूलादेखील अटक केली. गीता, काजल आणि पांडूवर राज्य सरकारने साडे पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या दोन वर्षांत आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी 77 कट्टर माओवाद्यांना बेडय़ा ठोकल्या आहे.

गडचिरोलीच्या घनदाट जंगलात काजल आणि गीता या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक कुमार चिंता, एम रमेश, अंधेरीचे ऑफिसर कमांडिंग मोहित कुमार एसी, दीपक दास, उपनिरीक्षक चेतन परदेशी, पी.एस. गट्टा, वैभव रुपवते, आदी पथक तेथे गेले. पोलिसांनी गडचिरोली -कांकेर येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या माध्यमातून त्या दोघीना ताब्यात घेतले.

काजल ही 2012पासून प्लाटून क्रमांक 55ची सदस्य म्हणून काम करत आहे. 2020पासून आतापर्यंत विभागीय समिती स्टाफ टीमची सदस्य म्हणून काम करत होती. 2019 ते 2021 या काळात पोलिसांसोबत झालेल्या 7 चकमकीत ती सामील होती. तसेच 2019मध्ये मौजा कनेली आणि पुसेर साखरदेव वन क्षेत्रात आयइडी पेरण्यात तिचा थेट सहभाग होता. तर गीता ही 2018 मध्ये भामरागडच्या एलओएसची सदस्य म्हणून ती काम करू लागली. 2019मध्ये मोरोमेट्टा येथे आणि 2020 मध्ये कोपरशी येथे पोलिसांसोबत अँब्यूश आणि गोळीबाराची तिने योजना आखली होती. त्या गोळीबारात एक अधिकारी आणि सी 60चा जवान शाहिद झाला होता. तर पांडूदेखील 2021पासून तो जनमिलिशियाचा कमांडर म्हणून काम करत होता. 2022 आणि 23 येथे त्याने पोलीस पाटलासह अन्य दोन जणांची हत्या केली होती. तसेच 2019मध्ये लोकसभा निवडणुकीत त्याने टिटोडा गावात स्फोटक पेरण्यात माओवाद्यांना मदत केली होती.

चार वर्षांपूर्वी या दोघीनी कोपरशीपोयारकोटी वनक्षेत्रात घातपात घडवून आणला होता. त्यात जवान शाहीद झाले होते. या प्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच गेल्या वर्षी त्या दोघीनी पोलीसपाटलांची हत्या केली होती

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;