युसूफ, रझाक यांच्यावर नवी जबाबदारी

वृत्तसंस्था/ लाहोर

पाक क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) विद्यमान निवड सदस्य मोहम्मद युसूफ आणि अब्दुल रझाक यांच्यावर  आता नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. चालू महिन्याच्या अखेरीस पाक आणि न्यूझीलंड यांच्यात पाकमध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी युसूफ आणि रझाक हे पाक संघाचे अनुक्रमे हंगामी प्रमुख प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षक म्हणून राहतील.

गेल्या काही कालावधीपासून पाक क्रिकेट संघाला कायमस्वरूपी प्रशिक्षक लाभलेला नाही. भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील निकृष्ट कामगिरीनंतर पीसीबीने तत्कालीन विदेशी प्रशिक्षकांची हकालपट्टी केली होती. दरम्यान, पीसीबीने नव्या प्रशिक्षकाच्या शोधमोहिमेला प्रारंभ केला आहे. पण विदेशी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी यांच्याशी पीसीबीने संपर्क साधला. पण या दोन्ही विदेशी प्रशिक्षकांनी दीर्घकालीन कराराची अट घातल्याने पीसीबीने त्यांचा विचार सोडून दिला आहे. आता न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी पाक संघाला युसूफ आणि रझाक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कर्स्टन यांच्यासमवेत पीसीबीची चर्चा अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 18 एप्रिलपासून पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला प्रारंभ होत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;