इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा मालिका विजय

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा मालिका विजय

► वृत्तसंस्था/ हॅमिल्टन

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने यजमान न्यूझीलंडचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील खेळवण्यात आलेल्या रविवारच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 7 गड्यांनी पराभव केला आहे. न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइनला ‘सामनावीर’ तर इंग्लंडच्या अॅमी जोन्सला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या मालिकेतील रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडचा डाव 46.3 षटकात 194 धावात आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 39 षटकात 3 बाद 195 धावा जमवित विजय नोंदविला.

इंग्लंडच्या डावामध्ये अॅमी जोन्सने 52 चेंडूत 6 चौकारांसह 50, चार्ली डीनने 64 चेंडूत 3 चौकारांसह 38, नॅट सिव्हर ब्रंटने 41 चेंडूत 3 चौकारांसह 27, कर्णधार नाईटने 50 चेंडूत 3 चौकारांसह 31, बाऊचरने 17 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 21 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेस केर आणि रो यांनी प्रत्येकी 3 तर अॅमेलिया केरने 2 व बेट्सने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये कर्णधार सोफी डिव्हाइनने नाबाद शतक झळकवले. तिने 93 चेंडूत 4 षटकात आणि 11 चौकारांसह नाबाद 100 धावा झळकवल्या. अॅमेलिया केरने 60 चेंडूत 4 चौकारांसह 31 तर ग्रीनने 54 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 38 धावा जमविल्या. बेट्स 6 धावावर तर प्लिमेर 4 धावावर बाद झाले. इंग्लंडतर्फे क्रॉस, नॅट सिव्हर ब्रंट आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – 46.3 षटकात सर्वबाद 194 (जोन्स 50, डीन 38, बाऊचर 19, नाईक 31, नॅट सिव्हर ब्रंट 27. अवांतर 14, जेस केर 3-39, रो 3-42, अॅमेलिया केर 2-46, बेट्स 1-12), न्यूझीलंड 39 षटकात 3 बाद 195 (सोफी डिव्हाइन नाबाद 100, अॅमेलिया केर 31, बेट्स 6, प्लिमेर 4, ग्रीन नाबाद 38, अवांतर 16, क्रॉस, नॅट सिव्हर ब्रंट, इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी).

……

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;