केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप नेत्यांचे दिल्लीत उपवास आंदोलन

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप नेत्यांचे दिल्लीत उपवास आंदोलन

आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी जंतरमंतर येथे एकदिवसीय उपवास आंदोलन केले.  बोस्टनमधील हार्वर्ड स्क्वेअर, लॉस एंजेलिसमधील हॉलीवूड साइन, वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाच्या बाहेर, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर आणि टोरंटो, लंडन, मेलबर्न येथील भारतीय नागरिकही केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ याच प्रकारे उपोषण, निदर्शने करत आहेत, असे आपच्या नेत्यांनी सांगितले.

दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल, उपसभापती राखी बिर्ला, मंत्री आतिशी, गोपाल राय आणि इम्रान हुसैन यांच्यासह अनेक वरिष्ठ आप नेते जंतरमंतर येथे सकाळी 11 वाजल्यापासून दिवसभराच्या ‘उपवास आंदोलना’ला बसले होते. आपची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान हे स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथील सामूहिक उपोषणात सहभागी झाले होते. देशाच्या इतर भागातही याच प्रकारे आपच्या कार्यकर्त्यांनी उपवास आंदोलन केले.

आपला नष्ट करण्याचा कट

दिल्ली अबकारी कर धोरणाशी संबंधित घोटाळय़ात ईडीने  केजरीवाल यांना केलेली अटक हा भाजपच्या ‘आप’ला नष्ट करण्याच्या कटाचा एक भाग असल्याचा आरोप पक्षाचे दिल्ली विभागाचे संयोजक गोपाल राय यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून केजरीवाल यांना रोखण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप आपने यापूर्वी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;